Pune : फेसबुकवरील ओळखीने झालं प्रेम; लग्नाच्या अमिषाने बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 17:55 IST2022-11-11T17:53:03+5:302022-11-11T17:55:01+5:30
जिवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध...

Pune : फेसबुकवरील ओळखीने झालं प्रेम; लग्नाच्या अमिषाने बलात्कार
पिंपरी : लग्न करण्याचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांपासून फेसबुक फ्रेंड महिलेवर बलात्कार करीत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना २०१९ ते १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत पिंपरी परिसरात घडली.
याप्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी (दि.१०) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मनोज रमेश शिरभाते (वय ४५, रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची त्यांच्या पतीसोबत घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असताना त्यांची आरोपीसोबत फेसबुकवर ओळख झाली. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यामध्ये जवळीक वाढली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून, तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.