Land scam case in Mundhwa : पौड न्यायालयात दोषारोपपत्र सादर;बावधन पोलिसांकडून दिग्विजय पाटीलचा तपास सुरूच

By नारायण बडगुजर | Updated: February 3, 2026 14:02 IST2026-02-03T14:01:03+5:302026-02-03T14:02:29+5:30

या गुन्ह्यात पसार असलेला दिग्विजय पाटील याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र सादर करून तपास सुरू ठेवला आहे.

Land scam case in Mundhwa Chargesheet submitted in Paud court; Bavdhan police continue investigation against Digvijay Patil | Land scam case in Mundhwa : पौड न्यायालयात दोषारोपपत्र सादर;बावधन पोलिसांकडून दिग्विजय पाटीलचा तपास सुरूच

Land scam case in Mundhwa : पौड न्यायालयात दोषारोपपत्र सादर;बावधन पोलिसांकडून दिग्विजय पाटीलचा तपास सुरूच

पिंपरी : मुंढवा येथील ४० हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात बावधन पोलिसांनी सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू आणि जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली शीतल तेजवाणी या दोघांविरुद्ध पौड न्यायालयात सोमवारी (दि. २) दोषारोपपत्र सादर केले. या गुन्ह्यात पसार असलेला दिग्विजय पाटील याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र सादर करून तपास सुरू ठेवला आहे.

पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा येथील ४० हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या ‘अमेडिया इंटरप्रायजेस एलएलपी’ कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली महिला शीतल तेजवाणी आणि दस्त नोंदणी करणारे सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात ६ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात तेजवाणी हिला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर बावधन पोलिसांनी तिचा ताबा घेतला. तर, या प्रकरणातील संशयित सहदुय्यम निबंधक तारू याला भोर येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. मात्र, या गुन्ह्यातील संशयित पाटील हा अद्याप पसार आहे.

  गुन्हा दाखल झाल्यानंतर निर्धारित मुदतीत दोषारोपपत्र सादर करणे आवश्यक असल्याने बावधन पोलिसांनी सोमवारी तारू आणि तेजवाणी या दोघांविरुद्ध पौड न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तर, गुन्ह्यातील पसार संशयित दिग्विजय पाटील याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र सादर करून तपास सुरू ठेवला आहे.  - विशाल गायकवाड (पोलिस उपायुक्त) 

Web Title : मुंधवा भूमि घोटाला: आरोप पत्र दाखिल; पाटिल की जांच जारी।

Web Summary : मुंधवा में 40 हेक्टेयर भूमि घोटाले में दो के खिलाफ आरोप पत्र दाखिल। रवींद्र तारू, शीतल तेजवानी नामजद। भगोड़े दिग्विजय पाटिल की जांच जारी; पूरक आरोप पत्र दाखिल किया जाएगा।

Web Title : Mundhwa land scam: Charge sheet filed; Patil investigation ongoing.

Web Summary : Charge sheet filed against two in Mundhwa land scam involving 40-hectare land. Ravindra Taru, Sheetal Tejwani named. Fugitive Digvijay Patil investigation continues; supplementary charge sheet to be filed.