‘दारुसाठी पैसे देत नाहीस, तुला खल्लास करतो’, शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

By नारायण बडगुजर | Updated: January 2, 2024 20:22 IST2024-01-02T20:21:20+5:302024-01-02T20:22:35+5:30

पोलिसांनी फारूक पठाण (३०), बादशाह शेलार (३०, दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला

If you don't pay for alcohol I am teasing you a farmer is beaten and threatened to die | ‘दारुसाठी पैसे देत नाहीस, तुला खल्लास करतो’, शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

‘दारुसाठी पैसे देत नाहीस, तुला खल्लास करतो’, शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे देत नाही या कारणावरून दोघांनी एका शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण केली. ‘‘तुला आता खल्लास करतो’’, असे म्हणत जीवे मारण्याची धमकीही दिली. तळेगाव दाभाडे येथे ३१ डिसेंबर रोजी रात्री साठेआठ ते पावणेनऊ या कालावधीत हा प्रकार घडला.

राजेंद्र मारुती शेलार (५६, रा. तळेगाव दाभाडे ) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. १) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी फारूक पठाण (३०), बादशाह शेलार (३०, दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेलार हे त्यांच्या पुतण्याच्या शेडमध्ये बसले होते. यावेळी पठाण आणि शेलार हे दोघेही तिथे आले. तू आम्हाला दारू पिण्यासाठी पैसे देत नाही उलट आमचा बाप काढतोस का, तुला आता जिवंत सोडणार नाही, खल्लासच करतो, असे म्हणत लोखंडी रॉडने फिर्यादी शेलार यांच्या डोक्यात व तोंडावर मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

Web Title: If you don't pay for alcohol I am teasing you a farmer is beaten and threatened to die