पिण्याच्या पाण्यासाठी मनसेचा पिंपरी महापालिकेवर हंडा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 17:05 IST2019-12-02T17:01:40+5:302019-12-02T17:05:54+5:30
महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

पिण्याच्या पाण्यासाठी मनसेचा पिंपरी महापालिकेवर हंडा मोर्चा
पिंपरी : धरण शंभर टक्के भरले असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी मनसेच्या वतीने सोमवारी महापालिका भवनावर मोर्चा काढला होता. त्यामध्ये महिलांनी हंडे, माठ घेऊन सहभाग नोंदविला. महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील पाणी कपात रद्द करावी, अशी मागणीही केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन एक आठवड्यापासून सुरू केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांना पत्र दिले होते. त्यानुसार महापालिका भवनासमोर आज दुपारी आंदोलनकरण्यात आले. यावेळी महापालिकेतील गटनेते आणि शहरप्रमुख सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनात हेमंत डांगे, अश्विनीताई बांगर, सिमाताई बेलापुरकर, सुजाता काटे, विशाल मानकरी, अनिता पांचाळ, वैशाली बौराटे, नितिन चव्हाण, अक्षय नाळे, मयूर कांबळे, प्रतिक शिंदे, विकास कदम, अजय अड़गळे, नारायण पठारे, तेजस दाते, सुजय शिंदे, दीपेन नाईक, नितिन कावळे, अधिकराव पोळ, राजू सावळे, चंद्रकांत दानवले, सुरेश सकट, मयूर चिंचवडे, दत्ता देवतरासे, रूपेश पटेकर, स्वप्निल महंगरे, रोहित काळभोर, संगीता देशमुख, स्नेहल बांगर, श्रद्धा देशमुख आदी उपस्थित होते. त्यानंतर शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना निवेदन दिले.
मनसे गटनेते सचिन चिखले म्हणाले, ह्यह्यपिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पाणी पुरेल एवढे मुबलक पाणी पवना धरणामध्ये असताना देखील पाणी कपात करुन पिंपरी-चिंचवडकरांना वेठीस धरण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे. महापालिकेने लादलेल्या पाणी-बाणीचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशा पद्धतीने नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे, जे निषेधार्ह आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजननाने पाणी पश्न गंभीर झाला आहे.ह्णह्ण
आंदोलन : पाणी कपातीच्या विरोधात मनसेच्या वतीने सोमवारी महापालिका भवनावर मोर्चा काढला होता. त्यामध्ये महिलांनी हंडे, माठ घेऊन सहभाग नोंदविला. महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.