हिंजवडी जळीतकांड प्रकरणातील आरोपी जनार्दन हंबर्डीकरला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:43 IST2025-03-27T17:43:17+5:302025-03-27T17:43:41+5:30

दिवाळीचा बोनस न दिल्याने आणि इतर कामेही सांगितल्याचा राग झाल्याने चालकानेच गाडीतील कामगारांना संपवल्याचे उघडकीस आले आहे

Hinjewadi arson case accused Janardan Hambardikar remanded in police custody till March 29 | हिंजवडी जळीतकांड प्रकरणातील आरोपी जनार्दन हंबर्डीकरला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

हिंजवडी जळीतकांड प्रकरणातील आरोपी जनार्दन हंबर्डीकरला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : हिंजवडी जळीतकांड प्रकरणातील चालक जनार्दन हंबर्डीकरला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केले होते. त्याला कोर्टाने  29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पुण्याच्या हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलच्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले होते. दिवाळीचा बोनस न दिल्याने आणि इतर कामेही सांगितल्याचा राग झाल्याने चालकानेच गाडीतील कामगारांना संपवल्याचे उघडकीस आले आहे. जनार्दन हंबर्डीकर असं या चालकाचं नाव आहे. नियोजनबद्द कट रचून त्याने हा प्रकार केला असल्याचं समोर आलं मात्र या चालकाने कंपनीवर जे आरोप केले, ते कंपनी मालकाने  फेटाळून लावले लावले. 

हिंजवडी जळीतकांड प्रकरणात मोठी अपडेट! चालकाला डिस्चार्ज, पोलिसांनी घेतले ताब्यात 

त्यानंतर आज अखेर चालक जनार्दन हंबर्डीकरला पोलिसांनी ताब्यात घेतले. टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवल्यानंतर चालकाचा ही पाय यात भाजला होता तर चौघांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच अन्य पाच कर्मचारी ही गंभीर जखमी झाले होते. 19 मार्चला ही घटना घडली. तेंव्हापासून चालक मेडिकल कस्टडी मध्ये उपचार घेत होता. आज डिस्चार्ज मिळताच हिंजवडी पोलिसांनी हंबर्डीकरला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

नेमकं काय घडलं? 

हिंजवडीतील फेज 2 मधील व्योम ग्राफिक्स कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन टेम्पो सकाळी पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे निघाले होते. त्यावेळी बुधवारी सकाळी आठच्या सुमारास चालकाच्या पायाखालील बाजूस अचानक आग लागली. मात्र, दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने मागील बाजूस असणाऱ्या चौघांचा होरपळून मृत्यू झाला आणि सहाजण जखमी झाले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असताना धक्कादायक माहिती समोर आली. टेम्पो ट्रॅव्हलर चा चालक जनार्दन हंबर्डीकर यांनीच हे सर्व कृत्य घडवून आणल्याच उघडकीस आले. आरोपी चालकाने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. तसेच वारजे येथून काडीपेटी घेतली होती. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही गाडीतील सीट खाली आणून ठेवल्या होत्या. हिंजवडीजवळ आल्यावर कंपनी काही अंतरावर असताना त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या, उडी मारली. केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका उडाला. स्फोट होण्यापूर्वीच चालक गाडीतून बाहेर उडी मारली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Hinjewadi arson case accused Janardan Hambardikar remanded in police custody till March 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.