शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
6
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
7
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
8
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
9
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
10
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
11
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
12
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
13
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
14
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
15
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
16
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

Hinjawadi Fire Incident :'बेंझिन केमिकल आणले, वारजेतून काडीपेटी घेतली अन् ..' चालकाने असा रचला कट 

By विश्वास मोरे | Updated: March 20, 2025 20:22 IST

हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलरला आग प्रकरणी अपघात नव्हे घातपात

हिंजवडी : हिंजवडीतील ‘आयटी’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागून चार जणांचा बळी गेल्याची घटना बुधवारी घडली होती. चोवीसतासानंतर हा अपघात नव्हे तर घातपात आहे, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. दिवाळीचा बोनस आणि  मजुरांचे काम सांगितल्याचा राग झाल्याने चालकानेच गाडीतील कामगारांना संपवल्याचे गुरुवारी सायंकाळी उघकीस आले आहे. जनार्दन हंबर्डीकर या चालकास पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील टप्पा दोनमधील व्योम ग्राफिक्स (तिरुमाला इंडस्ट्रिअल इस्टेट) कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन बुधवारी सकाळी मिनी बस (एमएच १४ सीडब्लू ३५४८) पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे निघाले होते. त्यावेळी बुधवारी सकाळी आठच्या सुमारास चालकाच्या पायाखालील बाजूस अचानक आग लागली. मात्र, दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने मागील बाजूस असणाऱ्या चौघांचा होरपळून मृत्यू झाला आणि सहाजण जखमी झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींची प्रकृती स्थिर आहे. 

 बेंझिन केमिकल आणले, वारजेतून काडीपेटी घेतली पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी माहिती दिली. त्यात घातपात असल्याचे उघड झाले आहे. विशाल गायकवाड म्हणाले, 'अपघात झाल्यानंतर पोलिसांनी आग कशामुळे लागली. याचा तपास सुरु केला. त्यावेळी शॉर्ट सर्किटने आग लागली नसल्याचे आढळून आहे. मग कामगारांशी आणि कंपनीत चौकशी केली त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये बोनस न दिल्याने आणि वेतन कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिली आहे, अशी माहिती उघड झाली आहे. नियोजनबद्द कट रचून त्याने हा प्रकार केला आहे. आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. तसेच वारजे येथून काडेपेटी घेतली होती. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही गाडीतील सीट खाली आणून ठेवल्या होत्या. हिंजवडीजवळ आल्यावर कंपनी काही अंतरावर असताना त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या, उडी मारली. केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका उडाला.  कशामुळे घडले ? १) हंबर्डीकर यांचे कंपनीतील त्यांच्या सहकाऱ्यांशी सतत वाद होत होते. दररोजच्या प्रवासातील समस्या आणि सहकारी कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक संघर्षांमुळे तणाव वाढत असल्याचे इतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी केलेल्या तपासात आढळले. २) हंबर्डीकर याने काडी पेटवून रासायनिक स्फोट घडवून गाडीला आग लावली. स्फोट होण्यापूर्वीच चालक गाडीतून बाहेर उडी मारली होती. 

 यांचा गेला नाहक बळी वाहन पेटवून झालेल्या अपघात सुभाष सुरेश भोसले (वय ४२, रा. वारजे), शंकर शिंदे (५८, रा. नऱ्हे), गुरुदास लोकरे (४०, रा. हनुमाननगर, कोथरूड), राजू चव्हाण (४०, वडगाव धायरी) यांचा मृत्यू झाला तर, जनार्दन हुंबर्डेकर (चालक, ५७, रा. वारजे), संदीप शिंदे (३७, रा. नऱ्हे), विश्वनाथ जोरी (५२, रा. कोथरूड), विश्वास लक्ष्मण खानविलकर (पुणे), प्रवीण निकम (३८), चंद्रकांत मलजी (५२, रा. दोघेही कात्रज) जखमी झाले. विश्वास कृष्णराव गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदीप बाबुराव राऊत बसमधून सुखरूप बाहेर पडले होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीfireआग