माहेरून रेशन आणण्यास सांगून विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 18:10 IST2021-10-14T18:10:41+5:302021-10-14T18:10:52+5:30

माहेरून पैसे व रेशन आणण्यास सांगून विवाहितेला मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास दिला

Harassment of a married woman by asking her to bring rations from her home | माहेरून रेशन आणण्यास सांगून विवाहितेचा छळ

माहेरून रेशन आणण्यास सांगून विवाहितेचा छळ

पिंपरी : माहेरून रेशन तसेच पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. दांडेकर पूल, पुणे येथे ११ मे २००४ ते १३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. 

विवाहितेने याप्रकरणी नातेवाईकांकडे आल्यानंतर चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पती कैलास रामसंभू उपाध्ये (वय ४२, रा. दांडेकर पूल, पुणे), दीर प्रकाश रामसंभू उपाध्ये (वय ४५), भाऊ अतुल गुरव (वय २७), मामा बाळू क्षीरसागर (वय ४७) आणि चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कैलास आणि फिर्यादी महिला यांचा दुसरा विवाह झाला आहे. फिर्यादी सासरी नांदत असताना आरोपीने वारंवार पैशांची मागणी करून व घरगुती कारणावरून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. माहेरून पैसे व रेशन आणण्यास सांगून विवाहितेला मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास दिला. तसेच फिर्यादीला घटस्फोट न देता आरोपीने तिसरे लग्न केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Harassment of a married woman by asking her to bring rations from her home