शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चौदा लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: October 14, 2016 05:43 IST

एक व्यक्ती पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकाने लाखोंचा बेकायदा साठा केलेला गुटखा

पिंपरी : एक व्यक्ती पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकाने लाखोंचा बेकायदा साठा केलेला गुटखा जप्त केला आहे. विशेष म्हणजे जी व्यक्ती पिस्तूल घेऊन येणार होती, त्या व्यक्तीच्या गोदामातूनच युनिट तीनच्या पथकाने सुमारे १४ लाख, १६ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. ओमप्रकाश पुखराज माळी (वय ४०, रा. भिसे कॉलनी, पिंपळे सौदागर) असे या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई पिंपळे सौदागर येथे करण्यात आली.गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पिंपळे सौदागर येथील बोरापार्क इमारतीमध्ये एक व्यक्ती दुपारी पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सकाळी ११च्या सुमारास सापळा रचला. आरोपीला पकडण्यासाठी दबा धरून थांबले असता, एक जण त्या ठिकाणी आला. पळून जाऊन तो शटर उचकटून एका गोदामात शिरला. पोलिसांना त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनीही पाठोपाठ गोदामात प्रवेश करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी गोदामाची तपासणी केली असता, विविध प्रकारच्या गुटख्याची पोती, तसेच बॉक्समध्ये भरलेला बेकायदा गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला घटनेची माहिती देऊन, त्या ठिकाणी बोलावले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे १४ लाख, १६ हजार ७०० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम मोरे, रवींद्र बाबर, शिवाजी राहीगुडे, गुणशिलंम रंगम यांनी केली आहे.(प्रतिनिधी)