निगडी : कॉँग्रेसने कितीही विरोध केला, तरी वस्तू व सेवा कर (जीएसटी) हा कायदा राज्यसभेच्या अधिवेशनात संमत करूच, असा विश्वास केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला.दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडिया पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने निगडी येथे आयोजित संवाद कार्यक्रमात नक्वी बोलत होते. या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, शिवाजी झावरे, सर्वेश जोशी, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष सुहास गार्डी, उपाध्यक्ष रवींद्र नेर्लेकर, सचिव युवराज तावरे, खजिनदार अमोद भाटे उपस्थित होते. कॉँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष यांच्या विचारांचीदेखील दखल घेऊ. त्यांच्या सूचनांना प्राधान्य देऊ हा कायदा आम्ही ९९ टक्के येत्या पावसाळी अधिवेशनात पास करणारच. असे ठोकपणे सांगत पुढे नक्वी म्हणाले की, भाजप सरकारने व्यापाऱ्यांसाठी जाचक असणारे एकूण १८०० कायदे मोडीत काढले आहेत. मोदी सरकार हे व्यापाऱ्यांचे हित सतत डोळ्यांसमोर ठेवून काम करते. जगभरात मंदी सुरू असतानाही भाजप सरकारने जीडीपी ७.६८ टक्क्यांवर नेला. देशात इतर देशांनीही गुंतवणूक वाढवली असून, हे केवळ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य झाले. प्राजक्ता चिंचोळकर यांनी आभार मानले.(वार्ताहर)
जीएसटीचा कायदा मंजूर करणार
By admin | Updated: June 25, 2016 00:26 IST
कॉँग्रेसने कितीही विरोध केला, तरी वस्तू व सेवा कर (जीएसटी) हा कायदा राज्यसभेच्या अधिवेशनात संमत करूच, असा विश्वास केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला.
जीएसटीचा कायदा मंजूर करणार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}