gold stolen by dhoomstyle minor boys arrested | ' धुमस्टाईल' ने सोन्याचे दागिने चोरणारे अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात
' धुमस्टाईल' ने सोन्याचे दागिने चोरणारे अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात

राजगुरूनगर : धुमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या खेडपोलिसांनी २४ तासांच्या आत दोन अल्पवयीन मुलांना जेरबंद केले आहे. 
याबाबात सविस्तर माहिती अशी, चांडोली येथे अमुल डेअरी लगत वडगाव रोडने (दि ७ रोजी ) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुमन सुभाष पाटोळे (रा. वडगाव ता खेड ) ह्या वडगाव येथे चालत जात होत्या. दरम्यान त्यांचा मागेमागे अल्पवयीन एक चोरटा आला. सुमन पाटोळे यांच्या गळ्यातील सुमारे ४५ हजार रुपयांचे दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने हिसका मारून जबरीने चोरून रस्त्यावरच असलेल्या दुसऱ्या मित्राच्या मोटार सायकलवरून धुम स्टाईलने पळून गेले. अज्ञात चोरट्यांविरुध्द या महिलेने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर गुन्हयांचे अनुषंगाने तपास करताना पाटोळे यांनी चोरट्यांचे वर्णनावरुन खेड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी, , गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस कर्मचारी पोलिस हवालदार एन.एम थिटे, राजेश नलावडे, संतोष मोरे, संजय नाडेकर, बाळकुष्ण साबळे, संजय नाडेकर, शिवाजी बनकर, विकास पाटील यांनी घटनास्थळी लगतचे सीसीटिव्ही फुटेज तपासुन चोरट्यांचा शोध घेतला असता चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काळूस ( ता खेड ) येथे दोन अल्पवयीन चोरट्यांना पकडण्यात आले. त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसुन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले ४५ हजाराचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र व गुन्ह्यात वापरलेले वाहन क्रमांक ( एमएच. १४ एचएक्स. ३८६६ ) किंमत ५० हजार रुपये असा एकुन ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्यामधील एक अल्पवयीन चोरटा गुळणी घाट (ता खेड ) येथे काही महिन्यापुर्वी मिरचीची पुड डोळ्यांवर टाकून रात्रीच्या वेळी नागरिकांना लुटले होते. यापुर्वी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. असे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले....

Web Title: gold stolen by dhoomstyle minor boys arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.