Pune | महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटली गळ्यातील सोनसाखळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 18:25 IST2023-02-06T18:24:33+5:302023-02-06T18:25:55+5:30
दोन अनोळखीविरोधात गुन्हा दाखल ...

Pune | महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटली गळ्यातील सोनसाखळी
पिंपरी :हॉस्पिटलमधील वर्किंग रूममध्ये घुसत दोघांनी महिलेच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकत गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. हा प्रकार शनिवारी (दि. ४) सायंकाळी कासारसाई येथील एका खासगी क्लिनिकमध्ये घडला. याप्रकरणी महिलेने हिंजवडीपोलिस ठाण्यात रविवारी (दि. ५) फिर्याद दिली. दोन अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या हॉस्पिटलच्या वर्किंग रूममध्ये असताना दोन अनोळखी इसम खोलीत आले व त्यांनी फिर्यादीचे तोंड दाबून डोळ्यात मिरचीपूड टाकली. दरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी तोडून घेतली व पर्समधील रोख रक्कम असा एकूण २५ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.