कोयत्याने फोडल्या सहा वाहनांच्या काचा; पिंपळे गुरव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 18:40 IST2022-04-27T18:31:45+5:302022-04-27T18:40:20+5:30

सांगवी पोलीस ठाण्यात एकाव गुन्हा दाखल

glass of six vehicles smashed incident at pimple gurav pune crime news | कोयत्याने फोडल्या सहा वाहनांच्या काचा; पिंपळे गुरव येथील घटना

कोयत्याने फोडल्या सहा वाहनांच्या काचा; पिंपळे गुरव येथील घटना

पिंपरी : धुडगूस घालत एका अनोळखी व्यक्तीने कोयत्यासारख्या हत्याराने एक टेम्पो व पाच चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. पिंपळे गुरव येथे बुधवारी (दि. २७) रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

सूर्यभान दगडू चोथवे (वय ४०, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव, सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीसह परिसरातील काही नागरिकांनी त्यांची वाहने नेहमीप्रमाणे पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकाजवळील बट्टू आप्पा जगताप गार्डन शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत पार्क केली होती. फिर्यादी रात्री एकच्या सुमारास त्यांच्या टेम्पोमधील डिझेलची पाहणी करून टेम्पोमधील साफसफाई करीत हाेते. त्यावेळी अनोळखी आरोपी हा काेयत्यासारख्या हत्याराने चारचाकी वाहनांच्या काचा फोडत होता.

तोडफोडीचा आवाज आल्याने टेम्पोमध्ये असलेल्या फिर्यादीने टेम्पोची काच खाली घेऊन पाहिले असता आरोपी हा वाहनाच्या काचा फोडताना दिसून आला. त्यानंतर आरोपी हा फिर्यादीच्या टेम्पोजवळ आला. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या टेम्पोच्याही काचा फोडल्या. त्यामुळे फिर्यादी हे ओरडले असता आरोपी पळून गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली.

Web Title: glass of six vehicles smashed incident at pimple gurav pune crime news