मुलांची बॉलवरून मुलीला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 17:28 IST2021-11-07T16:07:17+5:302021-11-07T17:28:17+5:30

मुले क्रिकेट खेळत असताना महिलेला बाॅल लागला होता

The girl was beaten up in a cricket dispute in Pimpri | मुलांची बॉलवरून मुलीला मारहाण

मुलांची बॉलवरून मुलीला मारहाण

पिंपरी : क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून एका महिलेला व तिच्या मुलीला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच गैरवर्तन करून मुलीचा विनयभंग केला. मावळ तालुक्यातील इंदोरी गावाच्या हद्दीत १ नोव्हेंबरला ही घटना घडली.

याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने शनिवारी (दि. ६) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नंदकुमार कुसळ, मंदा कुसळ, स्वाती कुसळ, कोमल कुसळ (सर्व रा. इंदोरी गावच्या हद्दीत, ता. मावळ) यांच्या विरोधोत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नंदकुमार कुसळ यांची मुले व इतर मुले क्रिकेट खेळत असताना फिर्यादी महिलेला बाॅल लागला. तो बॉल महिलेने त्यांच्या ताब्यामध्ये घेतला. तो बॉल दिला नाही आरोपींनी फिर्यादीच्या घरामध्ये अनाधिकाराने प्रवेश करून फिर्यादीच्या मुलीला घराबाहेर आणून मारहाण केली. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून आरोपी नंदकुमार कुसळ याने तिचा विनयभंग केला. फिर्यादी व त्यांच्या मुलीला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली.

Web Title: The girl was beaten up in a cricket dispute in Pimpri