भोसरीत तब्बल आठ लाखांचा गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 11:37 IST2023-06-08T11:36:19+5:302023-06-08T11:37:03+5:30

ही कारवाई मंगळवारी (दि.६) मुंजाबा चौक, भोसरी येथे करण्यात आली...

Ganja worth eight lakh seized in Bhosari; Action of Anti-Narcotics Squad | भोसरीत तब्बल आठ लाखांचा गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

भोसरीत तब्बल आठ लाखांचा गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी : तब्बल आठ लाख रुपये किमतीचा ३२ किलो गांजाची साठवणूक करून तो विक्री करणाऱ्याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी (दि.६) मुंजाबा चौक, भोसरी येथे करण्यात आली. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस नाईक विजय दीपक दौंडकर यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संजय मोहन शिंदे (वय ३६, नेहरुनगर, भोसरी) याला अटक केली आहे तर, सूरज झंजाळ (रा. चाकण) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय याच्या ताब्यात पोलिसांना सात लाख रुपये किमतीचा सात लाख ८१ हजार रुपये किमतीचा गांजा विक्रीकरता स्वत:जवळ बाळगल्याचा मिळून आला. आरोपीने हा गांजा आरोपी सूरज झंजाळ याच्याकडून आणल्याची कबुली पोलिसांनी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Ganja worth eight lakh seized in Bhosari; Action of Anti-Narcotics Squad