पिंपरीत गॅंगवार! गुंड शरद मोहोळ टोळीचा राडा; म्हाळुंगेतील राधा चौकात वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 07:08 PM2022-02-10T19:08:49+5:302022-02-10T19:08:58+5:30

व्यावसायिक वादातून पिस्तूल दाखवून धमकी दिल्याने शरद मोहोळ टोळीच्या सदस्यांनी राधा चौक, म्हाळुंगे येथे रस्त्यावर दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली

gangwar in pimpri goon sharad mohol gang vehicles vandalized at radha chowk in mahalunge | पिंपरीत गॅंगवार! गुंड शरद मोहोळ टोळीचा राडा; म्हाळुंगेतील राधा चौकात वाहनांची तोडफोड

पिंपरीत गॅंगवार! गुंड शरद मोहोळ टोळीचा राडा; म्हाळुंगेतील राधा चौकात वाहनांची तोडफोड

googlenewsNext

पिंपरी : गॅंगस्टर शरद मोहोळ टोळीने राडा करून दहशत पसरविल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यावसायिक वादातून पिस्तूल दाखवून धमकी दिल्याने शरद मोहोळ टोळीच्या सदस्यांनी राधा चौक, म्हाळुंगे येथे रस्त्यावर दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. हा प्रकार ८ जानेवारीला रात्री सव्वाबारा ते एक या कालावधीत घडला.

शरद हिरामण मोहोळ (रा. माऊलीनगर, सतारदरा, कोथरूड), आलोक शिवाजी भालेराव (रा. वडाची वाडी, पौड रोड, कोथरूड), मल्हारी मसुगडे (रा. माळवाडी, पुनावळे), सिद्धेश बाहू हगवणे (वय ३०, रा. म्हाळुंगे, पुणे) आणि पाच ते सहा अनोळखी इसम (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल शेलार याने व्यावसायिक वादातून सिद्धेश हगवणे याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली. सिद्धेश हगवणे हा शरद मोहोळ टोळीतील सदस्य आहे. त्याने शरद मोहोळ याच्या सांगण्यावरून सिद्धेश हगवणे, मल्हारी मसुगडे, आलोक भालेराव यांनी विठ्ठल शेलार आणि त्याचे सहकारी समजून एका कारमधून जाणऱ्या साथीदारांवर दगड आणि कुंड्या फेकून मारत गंभीर हल्ला केला. तसेच राधा चौक व तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जीवाची पर्वा न करता सार्वजनिक रस्त्यावर दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या. आरोपींनी लोकांमध्ये दशहत निर्माण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे तपास करीत आहेत.

Web Title: gangwar in pimpri goon sharad mohol gang vehicles vandalized at radha chowk in mahalunge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.