किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली

ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची पहिली बॅच अमेरिकेला पोहोचली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 07:29 PM2024-05-27T19:29:00+5:302024-05-27T19:29:27+5:30

whatsapp join usJoin us
Former Pakistan player Wasim Akram says that the players of Team India for T20 World Cup 2024 cannot say that they are tired due to not playing the IPL final 2024  | किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली

किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची पहिली बॅच अमेरिकेला पोहोचली आहे. कर्णधार रोहित शर्मासह प्रमुख खेळाडू न्यूयॉर्कच्या धरतीवर दाखल झाले आहेत. आयपीएल २०२४ किताब जिंकण्यात कोलकाता नाईट रायडर्सला यश आले. त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. खरे तर यंदाच्या आयपीएलची फायनल खेळणाऱ्या दोन्हीही संघातील एकही शिलेदार भारताच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा भाग नाही. याचाच दाखला देत पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने भारतीय शिलेदारांना मिश्किल टोला लगावला आहे. (Wasim Akram On Team India) 

केकेआरच्या संघाचा रिंकू सिंग विश्वचषकाच्या संघाचा हिस्सा आहे, पण तो राखीव खेळाडू आहे. भारतीय खेळाडूंना टोला लगावताना अक्रमने म्हटले की, ठीक आहे, आयपीएलची फायनल खेळणारा एकही खेळाडू भारताच्या विश्वचषकाच्या संघाचा भाग नाही. म्हणजेच आता कोणीही हे म्हणू शकत नाही की आम्ही थकलो आहोत. प्रत्येक खेळाडू अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी लढत होता. पण, ते फायनलमध्ये न खेळू शकले हा एक आशीर्वाद असू शकतो. जर्सी बदलून भारतासाठी ते खेळत आहेत. अक्रम 'स्पोर्ट्सकीडा'शी बोलत होता.

अक्रमचा भारतीय खेळाडूंना टोला 
एकूणच भारताच्या विश्वचषकाच्या संघातील खेळाडूंनी पुरेसा आराम केला असून, ते फायनलचा भाग नसल्याने त्यांच्यावर कामाचा लोड देखील नाही. म्हणूनच ते आता किमान थकलो आहोत हे कारण सांगू शकत नाही. किंबहुना त्यांना अशी कारणे देखील सांगता येणार नाहीत, असे अक्रमने स्पष्ट केले. दरम्यान, १ जूनपासून ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार स्पर्धेतील पहिला सामना २ जून रोजी खेळवला जाईल, जो अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. टीम इंडिया ५ जूनपासून आपल्या अभियानाची सुरुवात करेल. भारत आणि आयर्लंड यांच्यात हा सामना होणार आहे. भारतीय संघाचा दुसरा सामना ९ जून रोजी पाकिस्तानविरूद्ध खेळवला जाईल.

विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. 

राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.

Web Title: Former Pakistan player Wasim Akram says that the players of Team India for T20 World Cup 2024 cannot say that they are tired due to not playing the IPL final 2024 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.