शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

सहा हजार लिटर पाणी मोफत, स्थायी समितीचा निर्णय : दरवाढीला राष्ट्रवादी, शिवसेनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 5:20 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कुटुंबाला सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत देण्याचा निर्णय स्थायी समिती सभेत बुधवारी घेण्यात आला. नागरिकांना पिण्याचे पाणी मोफत देणारी राज्यातील पहिली महापालिका आहे. त्यामुुळे पिण्याच्या पाण्याची बचतही होईल, नागरिकांनी पाण्याची काटकसर करावी. कमीत कमी पाण्याचा वापर करून मोफत पाणी देण्याच्या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी केले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कुटुंबाला सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत देण्याचा निर्णय स्थायी समिती सभेत बुधवारी घेण्यात आला. नागरिकांना पिण्याचे पाणी मोफत देणारी राज्यातील पहिली महापालिका आहे. त्यामुुळे पिण्याच्या पाण्याची बचतही होईल, नागरिकांनी पाण्याची काटकसर करावी. कमीत कमी पाण्याचा वापर करून मोफत पाणी देण्याच्या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी केले.महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करून तो बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. या प्रस्तावावर सभेत चर्चा झाली. पाणीपट्टीवाढीसाठी प्रशासनाने प्रस्तावित केलेले दर जास्त असल्याची भावना सावळे व समितीच्या इतर सदस्यांनी व्यक्त केल्या. परंतु, पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च आणि त्यातून मिळणाºया उत्पन्नात मोठी तफावत असल्यामुळे दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे मत प्रशासनाच्या वतीने व्यक्त केले आहे.शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी वार्षिक १०९ कोटी रुपयांचा खर्च येतो. पवना नदीवर रावेत येथे बांधलेल्या धरणातून पाणी उचलणे, त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करणे, त्यानंतर नागरिकांना पाणीपुरवठा करणे, मीटर रीडिंगनुसार पाण्याचे बिल तयार करणे, त्याचे वाटप करणे या सर्व प्रक्रियेवर हा खर्च होतो. एकीकडे १०९ कोटींचा खर्च होत असताना नागरिकांनी वार्षिक ३४ कोटी रुपये पाणीपट्टीपोटी भरावेत, ही प्रशासनाची मागणी असते. परंतु, त्यातील अवघे २५ ते २६ कोटी रुपयांचीच वसुली होते. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर महापालिकेला वार्षिक ८० ते ८५ कोटी रुपयांचा तोटा होतो, असे स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने दिले.त्यानंतर सावळे यांनी महापालिकेने नळजोडाला मीटर असलेल्या प्रति कुटुंबाला दर महिन्याला सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत द्यावे, अशी सूचना केली. त्याचे स्वागत सर्वांनी केले. त्यामुळे १ एप्रिल २०१८ पासून प्रति कुटुंबाला दर महिन्याला सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत पुरवले जाणार आहे.व्यावसायिकांसाठी पाणी महागहॉटेल, रेस्टॉरंट व दुकानांना प्रति हजार लिटरसाठी ५० रुपये, खासगी शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, रुग्णालये व वसतिगृहांना प्रति एक हजार लिटरसाठी १५ रुपये, धार्मिक स्थळे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, धर्मादाय आयुक्तांची मान्यता व ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावरील मंडळे, तसेच महापालिकेच्या इमारती व मिळकतींना प्रति हजार लिटरसाठी १० रुपये आणि स्टेडियमला प्रति हजार लिटरसाठी २० रुपये दर आकारण्याचे प्रशासनाकडून प्रस्तावित करण्यात आले होते. या दरामध्ये स्थायी समितीने कोणतेही बदल केलेले नाहीत, असे सावळे यांनी सांगितले.दर महिन्याला सहा हजार एक ते १५ हजार लिटर पाण्याचा वापर केल्यास प्रति हजार लिटरमागे आठ रुपये, १५००१ ते २२५०० लिटरपर्यंत पाण्याचा वापर केल्यास प्रति हजार लिटरमागे साडेबारा रुपये, २२५०१ ते ३०००० लिटरपर्यंत पाण्याचा वापर केल्यास प्रति हजार लिटरमागे २० रुपये आणि ३०००१ लिटरच्या पुढे पाण्याचा वापर केल्यास प्रतिहजार लिटरमागे ३५ रुपये भरावे लागतील. त्याचप्रमाणे मीटर रीडिंगप्रमाणे पाणीपट्टीची आकारणी करण्यासाठी प्रतिकुटुंब महिना १०० रुपये, झोपडपट्टीतील प्रति नळजोडासाठी महिना ५० रुपये दर आकारण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater transportजलवाहतूक