Pune Crime | पुण्यात लग्नाच्या आमिषाने महिलेची ४१ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 18:43 IST2022-11-17T18:41:19+5:302022-11-17T18:43:00+5:30
पिडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी रोख स्वरूपात, ऑनलाइन पैसे घेतले...

Pune Crime | पुण्यात लग्नाच्या आमिषाने महिलेची ४१ लाखांची फसवणूक
पिंपरी : लग्नाचे अमिष दाखवून एका महिलेची ४० लाख ६७ हजारांची फसवणूक केली. ही घटना मे २०२१ ते १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत कुणाल आयकॉन रोड, पिंपळे गुरव येथे घडली. राकेश कुमार हकिमसिंग चहर (रा. उंड्री, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पिडित महिलेने बुधवारी (दि. १६) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी आणि पिडित महिला यांची ओळख इन्टाग्रामवर झाली. आरोपीने महिलेशी जवळीक साधन तिचा विश्वास संपादन केला. आरोपीचे लग्न झालेले असतानाही त्याने ते लपवून ठेवले. तसेच आपल्याकडे खूप प्रॉपर्टी असल्याचे सांगितले.
पिडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी रोख स्वरूपात, ऑनलाइन पैसे घेतले. तसेच महिलेला कर्ज काढायला लावून तिच्याकडून कर्जाची रक्कमही घेत तिची ४० लाख ६७ हजारांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस निरीक्षक सुनील तांबे तपास करीत आहेत.