शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

तळेगाव स्टेशन येथे आॅनलाईनद्वारे अवैध जुगारअड्डा चालविणाऱ्या चौघांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 3:14 PM

तळेगाव रेल्वे स्टेशन जवळील वीरचक्र चौक येथे अवैधरित्या आॅनलाईन जुगार अड्डा चालविणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देआरोपींकडून ४५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 

 तळेगाव : तळेगाव रेल्वे स्टेशन जवळील वीरचक्र चौक येथे अवैधरित्या आॅनलाईन जुगार अड्डा चालविणाऱ्या आरोपींना गुरुवारी(दि.२३) पोलिसांनीअटक केली. चारही आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्व आरोपींना वडगाव मावळ न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मयूर शिवाजी बोऱ्हाडे (वय २६ रा. शिरूर जि.पुणे), कोमीर वसंत बुराडे (वय २८), अजय दिलीप गायकवाड (वय १९), विठ्ठल मानाजी सांगळे (तिघेही रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ) असे अवैध आॅनलाईन जुगार अड्डा चालविणाऱ्या आरोपींची नावे आहेत. सहाय्यक उपायुक्त श्रीधर जाधव यांना तळेगाव स्टेशन भागात आॅनलाईन अवैध जुगारअड्डा चालू असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली.पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, कर्मचारी सुर्यकांत गोरडे, विठ्ठल वडेकर, दीपक कदम आदींनी घटनास्थळी छापा टाकून मयूर बोऱ्हाडे व त्यांचे साथीदार कोमीर बुराडे, अजय गायकवाड, विठ्ठल सांगळे यांना रंगेहाथ पकडत अटक केली. हे आरोपी आॅनलाईन जुगार अड्डा चालवित होते. त्यांच्याकडून रोख रक्कम ८ हजार ४०० रुपये, ४२ इंची टीव्हीस्क्रीन, संगणक, सीपीयू, कीबोर्ड, डोंगल असा एकूण ४५ हजार ९०० रुपयांचा माल हस्तगत केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करत आहेत.  

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसPuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसArrestअटक