लग्न करण्यास केली जबरदस्ती, तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 09:28 IST2023-11-09T09:28:19+5:302023-11-09T09:28:33+5:30
तरुणीला फोन करून, भेटून लग्न करण्यासाठी जबरदस्ती करून वाद घालत असे

लग्न करण्यास केली जबरदस्ती, तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
पिंपरी : मित्रासोबत झालेल्या वादातून २१ वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.५) सकाळी साडेअकराच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली. या प्रकरणी मृत्यू झालेल्या तरुणीच्या बहिणीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित ऋषभ उर्फे पिन्या अविनाश कांबळे (रा.सिद्धार्थनगर, औंध) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची बहिण आणि संशयित यांच्यामध्ये मैत्री होती. मागील एक वर्षापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र, संशयित हा फिर्यादीच्या बहिणीस फोन करून, भेटून लग्न करण्यासाठी जबरदस्ती करून वाद घालत होता. संशयिताच्या धमकी देऊन फिर्यादीच्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे फिर्यादीत नमूद आहे.