पूर्ववैमनस्यातून चिखलीत पाच जणांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 13:37 IST2019-02-14T13:36:19+5:302019-02-14T13:37:11+5:30
महाविद्यालयात झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तीन जणांच्या टोळक्यांनी चिखली येथे जावून पाचजणांना लोखंडी रॉड आणि काठीने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले.

पूर्ववैमनस्यातून चिखलीत पाच जणांना मारहाण
पिंपरी : महाविद्यालयात झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तीन जणांच्या टोळक्यांनी चिखली येथे जावून पाचजणांना लोखंडी रॉड आणि काठीने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. या घटनेमध्ये एक महिला देखील जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी जाधववाडी, चिखली येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश संतोष इंगळे व इतर चौघे आशा पाच जणाना मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात शुभम ईश्वर तायडे (वय १९), शुभम देवानंद प्रधान (वय २२), महेश बाळू लगाडे (वय २२), जाधववाडी, चिखली) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी आणि आरोपी यांचे पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयात भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी चिखली येथे जाऊन पाच जणांना लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केली. तसेच धमकी दिली. चिखली पोलीस तपास करत आहेत.