शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

बनावट कागदपत्रप्रकरणी भाजपा नगरसेवकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:56 AM

पिंपरी : महापालिका निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात शिक्षणविषयक खोटी माहिती दिली.

पिंपरी : महापालिका निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात शिक्षणविषयक खोटी माहिती दिली. अकरावी अनुत्तीर्ण असताना बनावट दाखला तयार करून महाविद्यालयाची फसवणूक केली. हीच कागदपत्रे आणि माहिती सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रभाग २६चे नगरसेवक तुषार गजानन कामठे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी फिर्याद दिली आहे. ‘‘महापालिका निवडणुकीत तुषार कामठे यांनी खरी माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करणे गरजेचे होते. खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. महापालिका निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कामठे यांनी दिलेल्या शिक्षणाबद्दल शंका आल्याने माहितीच्या अधिकाराचा आधार घेतला. माहिती मिळविली. कामठे यांनी पुण्यातील मराठवाडा मंडळाचे ज्युनियर कॉलेज आॅफ कॉमर्स महाविद्यालयात १९९८ मध्ये अकरावी कॉमर्सला प्रवेश घेतला होता. त्या वर्षी ते नापास झाले होते. महाविद्यालयाकडून एफवायजेसी नापास असा शेरा मारला होता. त्यानंतर मार्च १९९९ मध्ये त्यांनी सांगवीतील बाबूराव घोलप महाविद्यालयात कॉमर्सकरिता प्रवेश घेतल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी देण्यात आलेल्या दाखल्यावर एफवायजेसी उत्तीर्ण असा शेरा असल्याचे दिसून आले.>सचिन साठेंनी केलेली तक्रार खोटी आहे. मी कोणतीही शिक्षणाची खोटी माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही. माझे शिक्षण झाले आहे ती कागदपत्रे निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेली आहेत. त्यामुळे सचिन साठे यांना महापालिकेच्या निवडणुकीत पराभवामुळे नैराश्य आले आहे आणि त्यामुळे ते माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत.- तुषार कामठे, नगरसेवक

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपा