शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

लोणावळ्यातील राहुल शेट्टी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधून काढा : प्रविण दरेकर यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2020 12:24 PM

लोणावळासारख्या शहरात अशा प्रकारची खुलेआम हत्या होणार असेल तर ते फार गंभीर आहे.

ठळक मुद्देशहर असुरक्षित राहिले तर त्याचा परिणाम येथील सर्वच व्यस्थेवर होईल..

लोणावळा : लोणावळा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिवंगत राहुल शेट्टी यांच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना तातडीने अटक झाली पाहिजे. पण या हत्येमागील प्रमुख सूत्रधार शोधून काढण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शनिवारी( दि.७) केली. 

लोणावळाचे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दिवंगत राहुल शेट्टी यांच्या कुटुंबियांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. शेट्टी यांच्या कुटुंबियांना धीर दिला. त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे पुणे ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे आदी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, लोणावळा सारख्या शहरात अशा प्रकारची खुलेआम हत्या होणार असेल तर ते फार गंभीर आहे. लोणावळा शहराची शांतता अशा घटनामुळे भंग होऊ शकते. दरदिवशी मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात येत असतात, त्यामुळे हे शहर असुरक्षित राहिले तर त्याचा परिणाम येथील सर्वच व्यस्थेवर होईल. या हत्या प्रकरणाचा सखोल तपास कराच व पण या प्रकरणातील मुळ सूत्रधार कोण हे शोधून काढा अशी मागणी प्रविण दरेकर यांनी येथील पोलिस अधिकार्‍यांकडे केली.

या प्रकरणातील गुन्हेगार कोणीही असले तरी त्याच्याविरुध्द कडक कारवाई झाली पाहिजे, हा प्रश्न आपण विधीमंडळाच्या अधिवेशनात मांडू व या शेट्टी कुटुबियांना न्याय मिळवून देऊ असेही दरेकर यांनी यावेळी  स्पष्ट केले.

टॅग्स :lonavalaलोणावळाCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिसPraveen Darekarप्रवीण दरेकर