तुझं शेत तिथपर्यंतच..! म्हणत शेतकऱ्याला हॉकी स्टिकने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 14:32 IST2026-01-25T14:30:43+5:302026-01-25T14:32:02+5:30

‘तुमचे जेवढे क्षेत्र आहे तेवढेच करा, आमच्या बाजूला येऊन का?’ असे म्हणत वाद घालायला सुरुवात केली.

Farmer beaten with hockey stick, saying "Your farm is only up to that point!" | तुझं शेत तिथपर्यंतच..! म्हणत शेतकऱ्याला हॉकी स्टिकने मारहाण

तुझं शेत तिथपर्यंतच..! म्हणत शेतकऱ्याला हॉकी स्टिकने मारहाण

पिंपरी : सुदुंबरे (ता. मावळ) येथील जमीन गट क्रमांक ५५ मध्ये शेतीची मशागत करत असताना जमिनीच्या सीमेवरून वाद होऊन एका शेतकऱ्याला हॉकी स्टिकने डोक्यात मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. १९) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

गोरख सीताराम गाडे (वय. ४३, रा. सुदुंबरे (ता. मावळ) असे जखमीचे नाव आहे. तर समीर ज्ञानोबा गाडे (३०), सतीश महादू गाडे (३५), संग्राम बाळासाहेब गाडे (३०) व शिवाजी महादू गाडे (५०, सर्व रा. सुदुंबरे) अशी संशयित आरोपींची नावे आहे.

सुदुंबरे गाव हद्दीतील गोरख गाडे हे शेतीची कामे करत असताना लगतच्या शेतकरी काशीनाथ गाडे यांनी ‘तुमचे जेवढे क्षेत्र आहे तेवढेच करा, आमच्या बाजूला येऊन का?’ असे म्हणत वाद घालायला सुरुवात केली. यानंतर फोन करून इतरांना बोलावले. समीर गाडे, सतीश गाडे, शिवाजी गाडे, संग्राम गाडे यांनी तेथे येत गोरख गाडे यांना पकडून हॉकी स्टिकने डोक्यात मारून जखमी केले.

Web Title : सुदुंबरे में भूमि विवाद में किसान पर हॉकी स्टिक से हमला

Web Summary : सुदुंबरे में भूमि सीमा विवाद को लेकर एक किसान पर हॉकी स्टिक से हमला किया गया। पीड़ित गोरख गाडे पर कई लोगों ने हमला किया। पुलिस ने घटना में शामिल संदिग्धों के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Farmer Assaulted with Hockey Stick Over Land Dispute in Sudumbre

Web Summary : A farmer was attacked with a hockey stick in Sudumbre over a land boundary dispute. The victim, Gorakh Gade, was assaulted by multiple individuals. Police have registered a case against the suspects involved in the incident.