शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, त्यावर्षी 'घाटाच्या राजाला' देणार मर्सिडिज; नितेश राणेंची जाहीर घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 17:37 IST

यावेळी शर्यत पाहून भारावलेल्या नितेश राणे यांनी, देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंत, त्या वर्षीचं पहिलं बक्षीस आपण मर्सिडिज गाडी जाहीर करतो, अशी मोठी घोषणा केली. 

पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीची संपूर्ण राज्यत जबरदस्त चर्चा सुरू होती. या शर्यतीसाठी जेसीबी, बलेरोपासून ते बुलेटपर्यंत तब्बल दीड कोटी रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. चिखली येथील ही शर्यत पाहण्यासाठी काल राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार नितेश राणेनींही हजेरी लावली होती. यावेळी शर्यत पाहून भारावलेल्या नितेश राणे यांनी, देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंत, त्या वर्षीचं पहिलं बक्षीस आपण मर्सिडिज गाडी जाहीर करतो, अशी मोठी घोषणा केली.  यावेळी नितेश राणे म्हणाले, "ज्या वर्षी आमचे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होतील, त्या वर्षी आमचे आमदार महेश लांडगे यांनी ही शर्यत परत आयोजित केल्यानंतर, त्या वर्षीचे पहिले बक्षीस हे मी माझ्याकडून मर्सिडिज गाडी जाहीर करतो. आता या दिवसापासून एवढीच प्रार्थना करायची, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परत एकदा देवेंद्र फडणवीस झालेच पाहीजे." यासंदर्भातील व्हिडिओही त्यांनी आपल्या फेसबूक अकाउंटवरून शेअर केला आहे. राणे यांनी ही घोषणा केल्यानंतर उपस्थितांमध्येही मोठा आनंद दिसून आला.

नितेश यांनी त्यांच्या ट्विटरवरूनही ही स्पर्धा सुरू असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते व्यासपीठावरून बैलगाडा शर्यतीचा आनंद घेताना दिसत आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देतानाही, "ज्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब होतील त्या वर्षी आमदार महेशदादा यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या राजाला (फायनल सम्राटला) माझ्याकडून मर्सिडिज गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल," असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. नितेश राणे यांनी ही पोस्ट भोसरीचे आमदार तथा पिंपरी-चिंचवडचेभाजपा शहराध्यक्ष महेश लंगडे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केली आहे. महत्वाचे म्हणजे, एकूण पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नितेश राणे, प्रकाश जावडेकर आणि सदाभाऊ खोत आदी नेत्यांनीही हजेरी लावली होती. 

या शर्यतीत, रामनाथ वारिंगे यांच्या बैलजोडीने केवळ 11:22 सेकंदांत घाट सर करत जेसीबी बक्षीस मिळवले. या जोडीबरोबरच इतर चार बैलजोड्यांनीही कमीत कमी वेळत हा घाट सर केला. यामुळे पाच जणांत हा जेसीबी बक्षीस म्हणून विभागून देण्यात आला. आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या या शर्यतीसाठी राज्य भरातून गाडामालकांनी सहभाग घेतला होता. तसेच, जवळपास १ हजार २०० बैल जोड्या अथवा गाड्यांनी या शर्यतीत भाग घेतला होता. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Bull Cart Raceबैलगाडी शर्यतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMercedes Benzमर्सिडीज बेन्झBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस