अत्यंत दुर्दैवी! भटक्या कुत्र्यावर केला धारधार शस्त्राने वार, डोक्यावर मार लागल्याने गमावले डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 11:24 IST2021-05-28T11:24:17+5:302021-05-28T11:24:41+5:30

कुत्र्याचे डोळे निकामे झाले असून, कायमस्वरूपी अंधत्व आल्याची शक्यता वर्तवण्यात आली

Extremely unfortunate! One attacked a stray dog with a sharp weapon, hitting him on the head and losing his eyes | अत्यंत दुर्दैवी! भटक्या कुत्र्यावर केला धारधार शस्त्राने वार, डोक्यावर मार लागल्याने गमावले डोळे

अत्यंत दुर्दैवी! भटक्या कुत्र्यावर केला धारधार शस्त्राने वार, डोक्यावर मार लागल्याने गमावले डोळे

ठळक मुद्देपिंपरीतील सांगवीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

पिंपरी: अज्ञात व्यक्तीने काल भटक्या कुत्र्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना पिंपरीतील सांगवी येथे घडली आहे. त्याला डोक्यावर मार लागल्याने डोळे गमवावे लागतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पवार नगर, सांगवी येथे गुरुवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी प्राणीमित्र अक्षय साहेबराव म्हसे (वय २५, रा. पवारनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसे दररोज भटक्या कुत्र्यांना अन्न देतात. दरम्यान, भटक्या कुत्र्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वार केले असल्याची माहिती फिर्यादीला मिळाली. त्यानुसार, त्यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ कुत्र्याला रुग्णालयात दाखल केले. 

कुत्र्यावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. तसेच त्याच्या डोक्याला जोरदार मार लागून त्याचे डोळे निकामी झाले आहेत. यात त्याला कायमस्वरूपी अंधत्व आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.      

Web Title: Extremely unfortunate! One attacked a stray dog with a sharp weapon, hitting him on the head and losing his eyes