लग्न करतो असं सांगून प्रस्थापित केले शरीरसंबंध; खोटं बोलणाऱ्या तरुणाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 10:39 AM2021-08-16T10:39:04+5:302021-08-16T10:39:39+5:30

भोसरी येथे ८ नोव्हेंबर २०१८ ते ३ मार्च २०२१ या कालावधीत ही घटना घडली.

Established sexual relations by saying that he marries; Rape case filed against youth for lying | लग्न करतो असं सांगून प्रस्थापित केले शरीरसंबंध; खोटं बोलणाऱ्या तरुणाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

लग्न करतो असं सांगून प्रस्थापित केले शरीरसंबंध; खोटं बोलणाऱ्या तरुणाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देतरुणीने लग्नाबाबत अनेक वेळा केली होती विनंती

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने तरुणाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी येथे ८ नोव्हेंबर २०१८ ते ३ मार्च २०२१ या कालावधीत ही घटना घडली. सरोज अरुण गांगुर्डे (वय २८, रा. रुपीनगर), असे आरोपीचे नाव आहे. महिलेने या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे २०१७ मध्ये पिंपरी येथील एका मॉलमध्ये नोकरीस होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली. त्यानंतर प्रेम झाले. तरुणाने शरीरसंबंधांची मागणी केली असता तिने नकार दिला. तेव्हा तिच्याशी लग्न करतो, असे म्हणून शरीर संबंध केले. त्यानंतर तरुणीने लग्नाबाबत अनेक वेळा विनंती केली. परंतु वेगवेगळी कारणे सांगून त्याच्याकडून टाळाटाळ करण्यात आली. लग्न करणार नाही, असे म्हणून फोन नंबरही ब्लॉक केला, तरुण आता फोन घेत नाही. तसेच हा लग्न करणार नसल्याची खात्री झाल्याने म्हणून तिने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Established sexual relations by saying that he marries; Rape case filed against youth for lying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.