Engineer youth commits suicide by status taking care of his sister | बहिणीला सांभाळा असा स्टेटस ठेवून इंजिनिअर युवकाची आत्महत्या

बहिणीला सांभाळा असा स्टेटस ठेवून इंजिनिअर युवकाची आत्महत्या

मोशी येथील अभियंत्याची आत्महत्या

पिंपरी : बहिणीला सांभाळा असे व्हॉट्स ऍप स्टेटस ठेवून इंजिनिअर युवकाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना स्पाईन रोड मोशी मधील एका सोसायटीत बुधवारी (८ जुलै) ही घटना घडली.

अक्षय अनिल पोतदार (२५, सध्या रा. संभाजीनगर, मुळगाव वाई सातारा) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा चिखली येथील एका कंपनीत काम करीत होता. धक्कादायक बाब म्हणजे अक्षय याने आई, वडील, बहिणीला सांभाळा असे व्हॉट्स ऍप स्टेटस ठेवून तो राहत असलेल्या इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून आत्महत्या केली आहे.

अक्षय याने स्पाईन रोड मोशी येथील फुड्स व्हीले सोसायटीतील फेज क्रमांक तीन मध्ये असलेल्या ए बिल्डिंग वरील अकराव्या मजल्यावरून बुधवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास आत्महत्या केली आहे. अक्षय हा या सोसायटीत आला तेव्हा त्याला सुरक्षारक्षकांनी थांबविले होते. काही कारण सांगून अक्षय हा इमारतीच्या अकराव्या मजल्यावर गेला. तेथे पाठीवरील सॅक आणि मोबाइल ठेवून तेथून अक्षय याने खाली उडी मारून आत्महत्या केली. अक्षय याच्या आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यातील फौजदार अमरदीप पुजारी तपास करीत आहेत.

Web Title: Engineer youth commits suicide by status taking care of his sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.