खंडाळा घाटात आठ वाहनांचा विचित्र अपघात; अडीच तास वाहतुक विस्कळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 21:36 IST2018-10-09T21:35:46+5:302018-10-09T21:36:32+5:30

मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अमृतांजन पुलाच्या खांबाला भरधाव वेगातील दुधाचा टँकर धडकून भीषण अपघात झाला होता.

Eight vehicles have a strange accident in Khandala Ghat; two hours traffic disrupted | खंडाळा घाटात आठ वाहनांचा विचित्र अपघात; अडीच तास वाहतुक विस्कळीत 

खंडाळा घाटात आठ वाहनांचा विचित्र अपघात; अडीच तास वाहतुक विस्कळीत 

ठळक मुद्देमार्ग बंद झाल्याने तब्बल अडीच तास वाहतुक विस्कळीत

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पुल परिसरात आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास आठ वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतुक तब्बल अडीच तास विस्कळीत झाली होती.
    मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अमृतांजन पुलाच्या खांबाला भरधाव वेगातील दुधाचा टँकर धडकून भीषण अपघात झाला होता. यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना या वाहतुक कोंडीत तीन कार, एक पिकअप, एक कंटेनर व ति ट्रेलर ही आठ वाहने एकमेकावर आदळल्याने हा विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग बंद झाल्याने तब्बल अडीच तास वाहतुक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने ही वाहने बाजुला केल्यानंतर साडेपाचच्या सुमारास वाहतुक पुर्वपदावर आली. दरम्यान या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Web Title: Eight vehicles have a strange accident in Khandala Ghat; two hours traffic disrupted