शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

मॉलमुळे सत्ताधाऱ्यांचे ‘अस्तित्व’ धोक्यात

By admin | Updated: June 14, 2016 04:44 IST

येथील संत तुकाराममहाराज व्यापारी संकुलाजवळील कला दालनात अस्तित्व मॉल सुरू केला होता. बचत गटांच्या नावाखाली सुरू असलेल्या मॉलच्या माध्यमातून व्यावसायिक वापर होत असल्याचे

निगडी : येथील संत तुकाराममहाराज व्यापारी संकुलाजवळील कला दालनात अस्तित्व मॉल सुरू केला होता. बचत गटांच्या नावाखाली सुरू असलेल्या मॉलच्या माध्यमातून व्यावसायिक वापर होत असल्याचे भाजपाने उघडकीस आणले होते. या मॉलची चौकशी सुरू केल्यानंतर संबंधित संस्थेला महापालिकेने नोटीस बजावली आहे. मात्र, कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. हा मॉल चालविणारी संस्था सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उच्चपदस्थ पदाधिकाऱ्याशी संबंधित असल्याने नोटीस हा केवळ फार्स असल्याची टीका भाजपाने केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेने अस्तित्व मॉल सुरू केला होता. तिथे पूर्णत: व्यावसायिक कंपन्यांच्या ब्रँडेड वस्तूंची विक्री होत असून, येथील व्यावसायिक आणि विक्रेत्यांकडून दरमहा भाड्यापोटी लाखो रुपये उकळले जात आहेत. याबाबत येथील समन्वय संस्था आणि संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली होती. त्यानुसार आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घातले असून, संबंधित समन्वय समितीला नोटीस बजावली. तसेच समन्वय संस्था म्हणून येथील बचत गटांचे कामकाज, हिशेब, त्रैमासिक लेखापरीक्षण, त्याची तपासणी मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाकडून करून घेणे बंधनकारक असतानाही संबंधित संस्थेने हा अहवाल सादर न केल्याचा आक्षेप घेतला होता.(वार्ताहर)कारवाईची मागणी कागदपत्रांची पूर्तता नसताना आणि करार वेळेवर न केल्याने महापालिकेच्या लाखो रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले आहे. दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आक्षेपही घेण्यात आला होता. बचत गटांचे आयुक्तांना निवेदनदरम्यान, बचत गटांच्या प्रतिनिधींनी या संदर्भात बाजू मांडण्यासाठी आयुक्तांची भेट घेतली होती. निवेदन दिले होते. तसेच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना भेटूनही बचत गटांनी भूमिका मांडली होती. त्यामुळे आयुक्तांवर राजकीय दबाव येऊ शकतो. तसेच संबंधित संस्था ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तारूढ नेत्यांशी संबंधित आहे. त्यामुळे कारवाई होणार का, असा प्रश्न भाजपाने उपस्थित केला आहे.