चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार शिरली सोसायटीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 17:04 IST2018-12-01T17:02:44+5:302018-12-01T17:04:40+5:30

भरधाव मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटून थेट सोसायटीत घुसलेल्या मोटारीने उभ्या वाहनांना ठोकरले तर तिघेजण किरकोळ जखमी झाले.

driver lost control ; car went into society hitting other vehicles | चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार शिरली सोसायटीत

चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार शिरली सोसायटीत

वाकड : भरधाव मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटून थेट सोसायटीत घुसलेल्या मोटारीने उभ्या वाहनांना ठोकरले तर  तिघेजण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने फारशी वर्दळ नसल्याने मोठी हानी टळली. हा विचित्र अपघात शनिवारी (दि १) दुपारी दोनच्या सुमारास झाला.
          याबाबत माहिती अशी डांगे चौक हिंजवडी रस्त्यावर काळाखडक येथे वाकड सेंटर ही इमारत आहे. शनिवारी दुपारी एमएच १४, एफजी ९९९९ क्रमांकाची मोटार डांगे चौकाकडे जात असताना काळाखडक येथून पुन्हा यूटर्न घेताना नियंत्रण सुटून मोटार थेट समोरील सोसायटीत शिरली यात सहा दुचाकी व एका मोटारीला जोरदार धडक दिली यात त्या वाहनांचे नुकसान झाले आहे तर या अपघातात तीघे किरकोळ जखमी झाले आहेत.

 

Web Title: driver lost control ; car went into society hitting other vehicles