नात्याला काळिमा ! नराधम मामाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 12:42 IST2020-09-19T12:42:40+5:302020-09-19T12:42:59+5:30

भाचीच्या उमलत्या वयात शाबासकीची थाप देणे आवश्यक असताना जो हात पाठीवर पाहिजे होता तोच हात छातीवर आला..

Disgrace the relationship! Uncle sexually assaulted a minor girl | नात्याला काळिमा ! नराधम मामाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

नात्याला काळिमा ! नराधम मामाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

ठळक मुद्देअल्पवयीन पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद,गुन्हा दाखल

पिंपरी : मामा आणि भाचीचे नाते हे मातृत्वाचे प्रतिक मानले जाते. आई इतकीच ममता मामाकडून अपेक्षित असते. भाचीच्या उमलत्या वयात शाबासकीची थाप देणे आवश्यक असताना जो हात पाठीवर पाहिजे होता तोच हात छातीवर आला आणि एका नराधम मामाने या नात्याला काळीमा फासला. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका मामाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.   
याप्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (दि. १८) फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी महिला यांचा २२ वर्षीय भाऊ याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा पीडित मुलीचा मामा आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपी मामा तिला त्याच्या घरी घेऊन गेला. तसेच बेशुद्ध होईल, असे काहीतरी तिला प्यायला दिले. त्यानंतर तिच्याशी गैरकृत्य करून तिचा विनयभंग केला.  महात्मा फुलेनगर, मोशी येथे गुरुवारी (दि. १७) दुपारी साडेबारा ते दीडच्या दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७, ८, ११, १२ अन्वये बाल लैंगिक अत्याचार तसेच विनयभंगप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Disgrace the relationship! Uncle sexually assaulted a minor girl