तुला मस्ती आली आहे का? जावयाने केला सासूचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 16:37 IST2022-11-15T16:37:13+5:302022-11-15T16:37:19+5:30

आरोपीने सासूसह नातवालाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली

did you have fun Son-in-law molested mother-in-law | तुला मस्ती आली आहे का? जावयाने केला सासूचा विनयभंग

तुला मस्ती आली आहे का? जावयाने केला सासूचा विनयभंग

पिंपरी : तुला मस्ती आली आहे का?, तु माझ्या पत्नीला तुझ्याकडे ठेवेन घेतेसे असे म्हणत सासुला शिवीगाळ, मारहाण करत तिची साडी ओढून जावयाने विनयभंग केला. ही घटना चिखली येथे रविवारी (दि.१३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी जावया विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरात आपल्या पाच वर्षीच्या नातीसोबत असताना त्यांचा जावई तेथे आला. त्याने फिर्यादीला तु माझी पत्नी तुझ्याकडे ठेवून घेतेस असे म्हणत शिवीगाळ करत फिर्यादीचे डोके भिंतीवर आपटून फिर्यादीची साडी ओढून त्यांना विवस्त्र करू लागला. तेंव्हा फिर्यादीचे नातू आणि नात यांनी आरडाओरडा केला. तेंव्हा आरोपीनी तुला आता एक वेळ सोडतो नंतर बघून घेतो अशी धमकी दिली. आरोपी पळून जात असताना तेथे फिर्यादींचा मुलगा आला. आरोपीने त्याला सुद्धा लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तेथून पळ काढला.

Web Title: did you have fun Son-in-law molested mother-in-law