Video: पाण्यापासून वंचित! डोक्यावर बोचकं घेत महिला मुला, बाळांसह दलित कुटुंब निघाले मंत्रालयात, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 14:00 IST2025-02-15T13:58:30+5:302025-02-15T14:00:10+5:30
पाण्यापासून वंचित ठेवलं जातं, घरात येऊन मारझोड केली जाते, स्थानिक स्तरावर न्याय मिळत नाही त्यामुळे न्यायासाठी दलित महिला पिंपरी चिंचवडहुन मंत्रालयात पायपीट करत निघाल्या

Video: पाण्यापासून वंचित! डोक्यावर बोचकं घेत महिला मुला, बाळांसह दलित कुटुंब निघाले मंत्रालयात, नेमकं प्रकरण काय?
अश्विनी केदारी - जाधव
पुणे: डोक्यावर असं बाचकं घेऊन ही महिला आपल्या कुटुंबासोबत पुण्यातील पिंपरी चिंचवड होऊन मुंबईकडे पायी चालत निघाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तिचा संघर्ष सुरू आहे. मूळचे थेरगावचे असणारे हे कुटुंब सध्या जुन्या पुणे मुंबई हायवे वरून पायी चालत मुंबईच्या दिशेने निघालेत आता ते पनवेलला पोहोचले. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी हे कुटुंबीय पायपीट करत मुंबईला निघालेत. स्थानिक स्तरावर आपल्याला न्याय मिळत नाहीये त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा आहे, असं सांगत ही महिला मंत्रालयात निघाली.
जातीवाचक शिव्या दिल्या जातात मारझोड केली जाते, घरात घुसून धमकावले जातं इतकच काय तर पिण्याचे पाणी तोडलं, शौचालय तोडलं, अनेक प्रकारचा अन्याय मागच्या काही दिवसांपासून आमच्यावर होतोय असा आरोप या महिलेने केलाय. आणि त्यासाठीच तीन बहिणी आणि एक लहान मुलगा आणि मुलगी हातात बॅनर घेऊन मुंबईच्या दिशेने पायपीट करतात. मुंबईला पायी जाताना त्यांच्या हाती असलेल्या बॅनरवर, बाबासाहेबांनी दलितांसाठी चवदार तळे खुले केले. पण प्रशासनाने दलित कुटुंबाला 6 महिने पाण्यापासून वंचित ठेवले असा आरोपही केला आहे.
पोलीस स्टेशनमध्ये गेलो तरी आमचे तक्रार घेतली जात नाही पोलिसांकडून मारझोड होते असा आरोप या महिलांनी केला असला तरी प्रशासन आणि पोलिसांनी त्यांचे आरोप फेटाळल्याचे समोर येत आहे.महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन आपल्याला न्याय देत नसल्याने हे लोंढे कुटुंब आता मुंबईत मंत्रालयात थेट मुख्यमंत्र्यांचे भेट घेणारे आणि तिथेही न्याय मिळाला तर ते दिल्ली गाठणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.