देहूरोडला भांडणातून खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 02:20 IST2017-12-10T02:20:00+5:302017-12-10T02:20:15+5:30

पतंग उडवताना मुलाला का मारले? असा जाब विचारणा-या संबधित मुलाच्या बापाच्या पोटात डोक्यात दगड घालून खूनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास येथील आंबेडकरनगर-मामुर्डी रस्त्यालगत घडली.

 Dehurodake attempt to murder in a dispute | देहूरोडला भांडणातून खुनाचा प्रयत्न

देहूरोडला भांडणातून खुनाचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
देहूरोड : पतंग उडवताना मुलाला का मारले? असा जाब विचारणा-या संबधित मुलाच्या बापाच्या पोटात डोक्यात दगड घालून खूनाचा
प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास येथील आंबेडकरनगर-मामुर्डी रस्त्यालगत घडली.
दीपक हनुमंत तपोदिसी (वय २५, रा गांधीनगर, सुभान अत्ल्ला हॉटेलमागे, देहूरोड) हे गंभीर जखमी असून त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपोदिसी यांचा मुलगा पतंग
उडवत असताना तिथे आलेल्या
शुभम (पूर्ण नाव, पत्ता, वय माहिती नाही) याने पतंग उडवू नको सांगून मारहाण केली. यावरून जाब विचारल्याने शुभमने तपोदिसी यांच्या पोटात लाथ घातली व तुुला माज आलाय म्हणत डोक्यात दगड घातला. शुभम विरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देहूरोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. तसेच तडीपार गुंडांचाही वावर वाढला आहे. या ठिकाणी अनेकवेळा छोट्या मोठ्या कारणावरून भांडणांचे प्रकार घडत आहेत. त्याचेच पर्यावसन खुनासारख्या घटनेत होत आहेत. परिसरातील अवैैध धंदे बंद करावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. परंतु पोलीस कारवाई करीत नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title:  Dehurodake attempt to murder in a dispute