जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 12:29 IST2020-03-10T12:29:01+5:302020-03-10T12:29:42+5:30

इंद्रायणी पुलाच्या कठड्याला धडकून भीषण अपघात

death of person in accident on Old Mumbai - Pune highway | जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात, एकाचा मृत्यू

जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात, एकाचा मृत्यू

कामशेत : जुना मुंबई-पुणे महामार्गावर कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पाथरगावाच्या हद्दीतील इंद्रायणी पुलाच्या कठड्याला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून हि घटना सोमवार (दि.९) अंदाजे ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कैसर रफिक नालबंद (वय ३५, रा. कामशेत ता. मावळ), यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.महेश आबासाहेब दाभाडे (वय ४३, रा. एल आय सी कॉलनी, पौड रोड, कोथरूड पुणे,) असे अपघातातील मयत व्यक्तीचे नाव आहे. 
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी (दि.९) सकाळी अंदाजे ७ वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे लेन वर पाथरगाव हद्दीतील इंद्रायणी पुलावर हुंदाई सेंट्रो कार ( क्र. एम एच १२ ई बी ५३८०) चालकाचे गाडीवरील निंयत्रण सुटल्याने कार सुरक्षा कठड्याला धडकून भीषण अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता. कार चालक कार मध्ये अडकून मयत झाल्याचे समजले. अपघातात मयत व्यक्ती जवळील आधारकार्डच्या वरून मिळालेल्या माहितीच्या आधारे मृत्यू झालेल्या चालकाची ओळख पटली. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

Web Title: death of person in accident on Old Mumbai - Pune highway