शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

रोषणाईने खेचली आयटीयन्सची गर्दी

By admin | Updated: September 11, 2016 00:59 IST

रहाटणी, हिंजवडी परिसरात यंदा अनेक गणेश मंडळांनी सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांवर भर दिला आहे. स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी असे देखावे साकारले आहेत.

हिंजवडी : रहाटणी, हिंजवडी परिसरात यंदा अनेक गणेश मंडळांनी सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांवर भर दिला आहे. स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी असे देखावे साकारले आहेत, तर काही मंडळांनी आकर्षक सजावट, रोषणाई, समाजप्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला आहे. देखावे पाहण्यासाठी परिसरामध्ये गर्दी होत आहे. अनेक वेळा मंडळाच्या कार्यकर्त्यांना गर्दी आवारण्यासाठी नाकी नऊ येत आहेत. हिंजवडी : आयटीनगरी हिंजवडी परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रोषणाईसह फुलांची सजावट व करमणुकींच्या कार्यक्रमावर भर दिला आहे. काही वर्षांपासून गणेश मंडळांमध्ये कमालीची स्पर्धा असून, मंडळांची संख्याही वाढत असल्याने देखावे पाहण्यासाठीदेखील गर्दी होत आहे. पंचरत्न मंडळाने ऐतिहासिक व पौराणिक देखाव्यांची पंरपरा कायम ठेवली आहे. शिवतेज मित्र मंडळाने रोषणाईसह मंदिर उभारले असून, किरण जांभूळकर मंडळाचे अध्यक्ष आहेत. वेताळबुआ परिसरातील शिवशक्ती मित्र मंडळाने आकर्षक सजावट केली असून, शुभम साखरे मंडळाचे अध्यक्ष आहेत. आदर्शनगरमधील आदर्श मित्र मंडळाने दररोज सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले आहेत. माण रो़डला असलेल्या संत तुकाराम गणेशोत्सव मंडळाने रोषणाई केली आहे. क्रांती मित्र मंडळाने आकर्षक सजावट केली आहे. हिंजवडीच्या मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने राजस्थानच्या धर्तीवरील मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. अरुण साखरे मंडळाचे अध्यक्ष असून, अ‍ॅड. शिवाजी जांभूळकर संस्थापक आहेत. हिंजवडी गावठाणातील जय भवानी मित्र मंडळाने सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रमांची परंपरा कायम ठेवत बालजत्रेचे आयोजन केले आहे. घसरगुंडी, पाळणा, झोका, विदूषक, मौत का कुआ अशी चित्तथरारक प्रात्यक्षिके व वेगवेगळ्या खेळांचा आनंद लुटता येत आहे. शिवसेनेच्या युवा सेनेचे तालुकाप्रमुख उमेश साखरे मंडळाचे अध्यक्ष आहेत.पुनावळे माळवाडी येथील अमर तरुण मंडळाने यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत शनिवार वाड्याची प्रतिकृती उभारली असून, दररोज विविध सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. (वार्ताहर)