विवाहितेच्या छळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 13:55 IST2018-12-13T13:54:14+5:302018-12-13T13:55:31+5:30

विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

criminal charges against 6 people for harassing married women | विवाहितेच्या छळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल

विवाहितेच्या छळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल

पिंपरी : माहेरहुन पैसे आणावेत, यासाठी तगादा लावुन विवाहितेचा शारिरीक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडीपोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा प्रफुल्ल कापडे (वय ४०,रा.संभाजीनगर,अकोला) या महिलेच्या पतीसह अन्य पाच जण अशा एकुण सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रफुल्ल इच्छाराम काकडे (रा.नागपूर), पद्मावती कापडे (वय ७५रा. प्राधिकरण, निगडी), दिनेश इच्छाराम कापडे (रा.पिंपरी), श्रद्धा दिनेश कापडे, अतुल इच्छाराम कापडे, शुभांगी अतुल कापडे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी संगनमत करून विवाहितेचा मानसिक, शारिरीक छळ केला. या प्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: criminal charges against 6 people for harassing married women