पैसे नाही दिले तर हातपाय तोडेल; भोसरी येथे एका तृतीयपंथीयावर खंडणीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 22:04 IST2021-08-07T22:04:10+5:302021-08-07T22:04:29+5:30

फिर्यादी महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी तृतीयपंथीयाने पैसे नाही दिले तर हात पाय तोडेल अशी धमकी दिली.

Crime registred against transgender of ransom at Bhosari | पैसे नाही दिले तर हातपाय तोडेल; भोसरी येथे एका तृतीयपंथीयावर खंडणीचा गुन्हा

पैसे नाही दिले तर हातपाय तोडेल; भोसरी येथे एका तृतीयपंथीयावर खंडणीचा गुन्हा

पिंपरी : पैसे नाही दिले तर हातपाय तोडेल अशी धमकी देणाऱ्या तृतीयपंथी इसमावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडेवस्ती, भोसरी येथील जयमाता दि किराणा दुकानात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला.

या प्रकरणी दुकानाच्या महिला मालक यांनी शुक्रवारी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तृतीयपंथीयावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांची मुलगी त्यांच्या किराणा दुकानात थांबले होते. यावेळी त्याठिकाणी आलेल्या आरोपी तृतीयपंथीयाने दोन हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादी महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने पैसे नाही दिले तर हात पाय तोडेल अशी धमकी दिली. तसेच, मुलीला शिवीगाळ करून दुकानासमोर आरडाओरडा केला असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Crime registred against transgender of ransom at Bhosari