शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

फसवणूकप्रकरणी माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 8:57 PM

जमिनीच्या व्यवहारात एका डॉक्टरची २२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह नऊ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहा प्रकार १९ मे २०१५ ते २० एप्रिल २०१९ या कालावधीत घडला.

पिंपरी : जमिनीच्या व्यवहारात एका डॉक्टरची २२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह नऊ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक अनंत कोरहाळे यांच्यासह अंगद नारायण चव्हाण, अमित मनानी, अशोक बागलाणी, प्रदीप वाघमारे, अनुप सिंग, स्वप्नील काटे, भिवा दास, माणिक रसाळ अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. महेश शिवाजी पांढरपट्टे (वय ३३, रा. गणेश हौसिंग सोसायटी, टॉवर लाईन रोड, ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी व आरोपी यांच्यात चिखलीतील एका जमिनीबाबत व्यवहार झाला होता. तसेच त्या जमिनीचे खरेदीखतही करण्यात आले होते. दरम्यान, ही जमीन दुसरयाच्या नावावर असल्याचे फिर्यादी यांना समजले. याबाबत फिर्यादीने विचारले असता तुम्हाला दुसरी जागा देतो त्या मोबदल्यात अजून पैसे द्यावे लागतील असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादीकडून २२ लाख ५० हजार रुपये घेतले. हा प्रकार १९ मे २०१५ ते २० एप्रिल २०१९ या कालावधीत घडला. दरम्यान, अद्यापही फिर्यादीला जागा अथवा पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी