शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘अनधिकृत’मुळे नगरसेवक अडचणीत

By admin | Updated: October 12, 2016 02:11 IST

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाच्या मुद्द्याचे भांडवल करून निवडणूक लढणारे अनेक नगरसेवक या वेळी अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यानेच अडचणीत येणार आहेत.

पिंपरी : अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाच्या मुद्द्याचे भांडवल करून निवडणूक लढणारे अनेक नगरसेवक या वेळी अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यानेच अडचणीत येणार आहेत. उमेदवारांना निवडणूक अर्जाबरोबर स्वत:च्या अथवा कुटुंबीयांच्या नावे अनधिकृत बांधकाम नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.गेल्या पाच वर्षांत अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा निर्णय होऊ शकला नाही. अनधिकृत बांधकाम नियमित करून देणार, अशी केवळ आश्वासने देऊन यापूर्वी निवडणुका लढल्या. आता हा मुद्दा कळीचा बनला असून, उमेदवारांसाठीच तो अडचणीचा ठरणार आहे. महापालिकेची २०१२ची निवडणूक लढून नगरसेवक झालेल्यांपैकी अनेक जणांनी अनधिकृत बांधकामे केल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्यावरील कारवाईचा मुद्दा उपस्थित झाला होता. सत्ताधारी राष्टवादी काँग्रेसचे बहुतांशी नगरसेवकांचा त्यात समावेश असल्याने महापालिका सभेत याबाबतचा निर्णय होऊ शकला नाही. निवडणूक खर्चाची मर्यादा चार लाख आहे. तीन अपत्य असणाऱ्यांना निवडणूक लढण्यास अपात्र ठरवले जाणार आहे. दोनपेक्षा अधिक अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र उमेदवाराने निवडणूक विभागाला सादर करणे बंधनकारक आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे अधिकारी यशवंत माने यांनी दिली. (प्रतिनिधी)