शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक झाले ठेकेदारावर उदार!

By admin | Updated: October 28, 2015 01:27 IST

ठेकेदार कमी खर्चात काम करण्याची तयारी दर्शवत असतानाही स्थायी समितीने मात्र त्याच कामासाठी वाढीव खर्चास उपसूचनेद्वारे मंजुरी देण्याचा धडाका लावला आहे.

पिंपरी : ठेकेदार कमी खर्चात काम करण्याची तयारी दर्शवत असतानाही स्थायी समितीने मात्र त्याच कामासाठी वाढीव खर्चास उपसूचनेद्वारे मंजुरी देण्याचा धडाका लावला आहे. प्रकल्पाचे काम सुरू होण्याअगोदरच उपसूचनेद्वारे वाढीव खर्चाला मंजुरी देण्याची भलतीच प्रथा स्थायी समितीने सुरू केली आहे. आठवडाभरातील हा दुसरा प्रकार आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाढीव खर्चाला मंजुरी देताना स्थायी समितीचे सदस्य ठेकेदारावर इतके उदार का झाले, अशी शंका उपस्थित होत आहे. जकातीनंतर एलबीटीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्नही आता कमी झाले आहे. उत्पन्न आणि खर्चाचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने काही महिन्यांतच त्याचे परिणाम दिसतील, अशी वस्तुस्थिती आहे. अशातही स्थायी समितीची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच आहेत.चापेकर चौक ते थेरगाव पूल या दरम्यानचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात येणार आहे. या कामासाठी १३ कोटी ७ लाख १४ हजार इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. यापैकी मे. अजवानी इन्फा. प्रा.लि. या ठेकेदाराने ३० टक्के कमी दराने म्हणजेच नऊ कोटी ६० लाख ७५ हजार रुपयांत हे काम करण्याची तयारी दर्शविली. ही निविदा स्वीकारण्यास आयुक्तांनीही मान्यता दिली. त्यांच्यासोबत करारनामा करण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. मात्र, स्थायी समितीने या विषयाला उपसूचना दिली. ठेकेदार नऊ कोटी ६० लाखांत हे काम करण्यास तयार असतानाही मूळ रकमेत म्हणजेच १३ कोटी सात लाख १४ हजारांत हे काम करण्याच्या उपसूचनेसह मूळ विषय मंजूर करण्यात आला. याच स्थायी समितीने असाच प्रताप मागील मंगळवारी (२० सप्टेंबर) झालेल्या सभेतही केला. डांगे चौक ते वाकड अंडरपास या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या कामासाठी २३ कोटी २७ लाख २६ हजार ७१८ इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला. यासाठी तीन ठेकेदारांनी निविदाही भरल्या. यापैकी अजवानी या ठेकेदाराने २९ टक्के कमी दराने म्हणजेच १७ कोटी १० लाख ७८ हजारांत या रस्त्याचे काम करण्यास तयारी दर्शविली. ही निविदा स्वीकारण्यास आयुक्तांनीही मान्यता दिली. त्यांच्यासोबत करारनामा करण्याचा प्रस्ताव स्थायीपुढे ठेवण्यात आला होता. मात्र, स्थायीने दोन आठवडे हा प्रस्ताव तहकूब ठेवला. दरम्यान, २० सप्टेंबरला झालेल्या सभेत त्याच ठेकेदाराकडून २३ कोटी २७ लाख २६ हजार रुपयांत हे काम करून घेण्यास उपसूचनेसह मान्यता देण्यात आली. त्यामुळे स्थायी समितीकडून ठेकेदाराला सहा कोटींची बक्षिशीच मिळाली आहे. (प्रतिनिधी)