कोरोना लॉकडाऊन चोरट्यांच्या चांगलाच 'पथ्या'वर;गुन्ह्यांचा छडा लावताना पोलिसांची 'अग्निपरीक्षा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 10:37 PM2020-10-23T22:37:02+5:302020-10-23T22:45:18+5:30

गेल्या वर्षीच्या तुलनेत चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलीस पडले कमी

Corona lockdown benifit to thieves; A many problems front of the pimpri police | कोरोना लॉकडाऊन चोरट्यांच्या चांगलाच 'पथ्या'वर;गुन्ह्यांचा छडा लावताना पोलिसांची 'अग्निपरीक्षा'

कोरोना लॉकडाऊन चोरट्यांच्या चांगलाच 'पथ्या'वर;गुन्ह्यांचा छडा लावताना पोलिसांची 'अग्निपरीक्षा'

Next
ठळक मुद्देकोरोनामुळे पोलिसांना घ्यावी लागते खबरदारी : गेल्या वर्षी २३ टक्के तर यंदा १८ टक्?के गुन्हे उघड

नारायण बडगुजर
पिंपरी : कोरोना महामारीमुळे यंदा गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात चोरीच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलीस कमी पडल्याचे दिसून येते. कोरोना महामारी व लॉकडाऊन यामुळे तपासात पोलिसांना अडचणी येत असून ही बाब चोरट्यांच्या पथ्यावर पडली आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत १५ पोलीस ठाणे असून, मोठा औद्योगिक परिसर आहे. त्यामुळे राज्यासह देशभरातील कामगार, मजूर व उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांचे येथे वास्तव्य आहे. त्याचा फायदा घेऊन गुन्हेगार व चोरट्यांनी देखील त्यांचा मोर्चा उद्योगनगरीकडे वळविला आहे. दरम्यान कोरोना काळात प्रवासाची साधने सहज उपलब्ध होत नसल्याने चोऱ्यांचे प्रमाण यंदा कमी झाल्याचे दिसून येते. मात्र त्याच तुलनेत या गुन्ह्यांतील तपासात लॉकडाऊनमुळे अडथळे येऊन गुन्हे उघड होण्याचे प्रमाणही घटले आहे. 

आयुक्तालयाच्या हद्दीत चोरीचे या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान ९१० तर गेल्यावर्षी १७१० गुन्हे दाखल झाले होते. यात गेल्यावर्षी २३ टक्के अर्थात ३८७ गुन्हे उघडकीस आले होते. तर यंदा केवळ १८ टक्के अर्थात १६८ गुन्हे उघडकीस आले आहेत. 
-----------------
लॉकडाऊन शिथील होताच खुनाचे गुन्हे वाढले
यंदा कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे दिसून येते. मात्र खुनाच्या गुन्ह्यांबाबत चिंताजनक परिस्थिती आहे. गेल्यावर्षी नऊ महिन्यांत ५२ तर यंदा ५० खून झाले. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात या गुन्ह्यांना आळा बसला होता. मात्र लॉकडाऊन शिथील होताच खुनाचे सत्र सुरू झाले होते. तसेच खुनाचा प्रयत्न प्रकरणी गेल्या वर्षी १०० टक्के गुन्हे उघड झाले होते. यंदा मात्र हे प्रमाण ९८ टक्के आहे. 
-------------------
गुन्हे                           २०२०    २०१९
खून                               ५०        ५२
खुनाचा प्रयत्न               ४१       ७०
सदोष मनुष्यवध           ४           १
चोरी                            १९०      १७७० 
दरोडा                          १८          २५
मारहाण                      ४४२      ५१९
बलात्कार                   १०८       १३४
विनयभंग                   २०६      ३४८
-----------------
लॉकडाऊनमध्येही पोलिसांनी खबरदारी घेत तपासकार्य सुरू ठेवले होते. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले.
- आर. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे)
------------------------------

Web Title: Corona lockdown benifit to thieves; A many problems front of the pimpri police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.