Pune Crime: कंडोमवरून झाली खुनाच्या गुन्ह्याची उकल; ४ हजारांसाठी तृतीयपंथींनी आवळला एकाचा गळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 16:32 IST2021-11-03T16:32:35+5:302021-11-03T16:32:42+5:30
पैसे देण्यास नकार दिला असता गळा आवळून त्यांच्या खिशातून चार हजार रुपये काढून घेतले

Pune Crime: कंडोमवरून झाली खुनाच्या गुन्ह्याची उकल; ४ हजारांसाठी तृतीयपंथींनी आवळला एकाचा गळा
पिंपरी : गळा आवळून एकाचा खून करून त्याच्याकडील चार हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र घटनास्थळी निरोध (कंडोम) मिळून आले. त्यावरून तपास करीत निगडी पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली. याप्रकरणी दोन तृतीयपंथींना अटक केली. चिंचवड, काळभोर नगर येथे प्रिमियर कंपनीच्या शेजारील मोकळ्या जागेत १ नोव्हेंबरला सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली होती.
बसराज भिमप्पा इटकल (वय ३८, रा. आनंदनगर, चिंचवड), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अंजली बाळू जाधव (वय २५), अनिता शिवाजी माने (वय २६, दोन्ही रा. थेरगाव), असे अटक केलेल्या तृतीयपंथींचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळभोरनगर, आकुर्डी येथे मोकळ्या जागेत एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मयताचा गळा आवळल्याचे वन होते. तसेच घटनास्थळी निरोधाचे पॅकेट व वापरलेले निरोध मिळून आले. त्यावरून पोलिसांनी तपास सुरु केला. गोपनीय खबऱ्यामार्फत त्यांना याभागात देहेविक्रीचा व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली. अधिक तपासात दोन तृतीयपंथी रात्रीच्या वेळी थांबत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अंजली आणि अनिता या दोन तृतीयपंथींना ताब्यात घेतले. आरोपींनी बसराज इटकल यांच्याकडे पैशाची मागणी केली. इटकल यांनी पैसे देण्यास नकार दिला असता गळा आवळून त्यांच्या खिशातून चार हजार रुपये काढून घेतले, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले.
निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे, सहायक निरीक्षक अमोल कोरडे, विजयकुमार धुमाळ, उपनिरीक्षक महेंद्र आहेर, विजय पवार, पोलीस कर्मचारी सतीश ढोले, सुधाकर आवताडे, शंकर बांगर, विनोद व्होनमाने, राहुल मिसाळ, विजय बोडके, भुपेंद्र चौधरी, तुषार गेंगजे, विलास केकाण, नितीन सपकाळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.