Pimpri Chinchwad Crime | "तुझं कोणासोबत अफेअर आहे का...?" नागपुरने पुण्यात येत केला तरुणीचा विनयभंग
By रोशन मोरे | Updated: March 21, 2023 16:57 IST2023-03-21T16:56:30+5:302023-03-21T16:57:43+5:30
जुन्या प्रेमसंबंधातून एकाने थेट नागपूरवरून पुणे गाठले...

Pimpri Chinchwad Crime | "तुझं कोणासोबत अफेअर आहे का...?" नागपुरने पुण्यात येत केला तरुणीचा विनयभंग
पिंपरी : जुन्या प्रेमसंबंधातून एकाने थेट नागपूरवरूनपुणे गाठले. तसेच तरुणीला तुझे तुझे कोणासोबत अफेअर आहे का?, असे म्हणत तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी (दि.१७) पाटीलनगर, बावधन येथे तसेच नागपूर येथे घडली. याप्रकरणी तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.२०) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी २३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी थेट नागपूरवरून बावधन येथे आला. त्याने फिर्यादी तरुणीला तुझे कोणा सोबत अफेअर आहे का? असे बोलून मारहाण केली. तसेच तसेच मनात लज्जा निर्माण होईल, असे गैरवर्तन केले. शनिवारी (दि.१८) आरोपी याने नागपूर येथे जावून फिर्यादीच्या आई वडिलांना धमकी दिली, तसेच फिर्यादीच्या वेगवेगळ्या पोन करून फोन करून तसेच प्रत्यक्ष पाठलाग करून त्रास दिला, असे फिर्यादीत नमूद आहे.