वर्गमित्रानेच लग्नाचे आमिष दाखवून वारंवार महिलेवर केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 12:15 IST2021-05-23T12:14:40+5:302021-05-23T12:15:02+5:30

तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

The classmate repeatedly abused the woman by showing the lure of marriage | वर्गमित्रानेच लग्नाचे आमिष दाखवून वारंवार महिलेवर केला अत्याचार

वर्गमित्रानेच लग्नाचे आमिष दाखवून वारंवार महिलेवर केला अत्याचार

ठळक मुद्देवेगवेगळ्या ठिकाणचे फ्लॅट भाड्याने घेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले

पिंपरी: वर्ग मित्र असलेल्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच लग्नाबद्दल विचारणा केली असता तिला मारहाण केली. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला अटक करण्यात आली आहे. निगडी, काळेवाडी, पिंपरी या ठिकाणी हा प्रकार घडला. 

राजकुमार सिध्दप्पा नागराळी (वय २५, रा. भोसरी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. महिलेने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली आहे.

पोलिसाांनी दिलेल्या माहितीनुसार, नागराळी हा महिलेचा वर्गमित्र आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त तो महिलेला निगडी परिसरातील एका हाॅटेलमध्ये घेऊन गेला. तू मला येथे का घेऊन आला आहेस, असे महिलेने विचारले. त्यावेळी त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच मित्राचे ओळखपत्र दाखवून हॉटेलमधील रुम बुक केली. त्यानंतर तेथे महिलेची इच्छा नसतानाही त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

या प्रकारानंतर तरुण महिलेचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या ठिकाणावरील भाड्याच्या फ्लॅट वर घेऊन जात असे. तिथे नवरा बायकोसारखे राहून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर महिलेने लग्लाबद्दल विचारल्यावर मारहाण केली. याबाबत महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणाला अटक केली आहे. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: The classmate repeatedly abused the woman by showing the lure of marriage