Chinchwad Bypoll Result | चिंचवडमध्ये 19 फेऱ्या पूर्ण; भाजपची आघाडी, NCP पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 13:12 IST2023-03-02T13:07:37+5:302023-03-02T13:12:28+5:30
भाजपच्या उमेदवार आश्विनी जगतापांची आघाडी...

Chinchwad Bypoll Result | चिंचवडमध्ये 19 फेऱ्या पूर्ण; भाजपची आघाडी, NCP पिछाडीवर
चिंचवड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांचा विजय झाला आहे. तर चिंचवड मतदारसंघातील मतमोजणी अजून सुरू आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. चिंचवडमध्ये १८ व्या फेरीअखेर भाजपच्या आश्विनी जगताप यांनी ११ हजार ७३ मतांची आघाडी घेतली आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. १८ व्या फेरीअखेरी भाजपच्या आश्विनी जगताप यांना ६४ हजार ६५९ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना ५३ हजार ५७६ मते मिळाली आणि राहूल कलाटे यांनी २१ हजार ५२६ मते मिळाली होती. १९ व्या फेरीनंतर जगताप यांना ६७ हजार ३०६ मते मिळाली. नाना काटे यांना ५५ हजार ७४७ तर अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांना २२ हजार ७७१ मते मिळाली आहेत.
चिंचवड पोटनिवडणूक | चिंचवडमध्ये आश्विनी जगताप आघाडीवर, नाना काटे पिछाडीवर#Chinchwadpic.twitter.com/NhQEjCV5Ft
— Lokmat (@lokmat) March 2, 2023