शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

येवले चहाच्या दुकानात विजेच्या धक्क्याने बालकामगाराचा मृत्यू; तळवडे येथील घटना, दुकानमालकावर गुन्हा दाखल

By नारायण बडगुजर | Published: March 12, 2024 5:18 PM

मालकाला दुकानातील फ्रिजच्या बॉडीमध्ये करंट (वीज प्रवाह) उतरतोय माहित असतानाही मुलाला फ्रिजवर चढून कप काढण्यास सांगितले

पिंपरी : फ्रिजच्या विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय बालकामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुकान मालकावर गुन्हा दाखल केला. तळवडेतील टाॅवर लाइन येथी येवले चहाचे दुकान येथे सोमवारी (दि. ११)  दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.

गणेश जगताप, असे गुन्हा दाखल झालेल्या दुकान मालकाचे नाव आहे. प्रेमकुमार सिद्धाराम  बनसोडे (४३, रा. मिलिंदनगर, ओटास्किम, निगडी) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रेमकुमार यांच्या मुलाचे वय १७ आहे हे माहिती असूनही गणेश जगताप याने त्याला कामावर ठेवले. तसेच दुकानातील फ्रिजच्या बॉडीमध्ये करंट (वीज प्रवाह) उतरत असल्याचे गणेश याला माहिती होते. कामगारांच्या सुरक्षिततेबाबत त्याने कोणतीही उपाययोजना केली नाही. तसेच फ्रिजमुळे विजेचा धक्का बसण्याची शक्यता असल्याचे कामगारांनी सांगितले. त्याकडेही गणेश जगताप याने दुर्लक्ष केले. तसेच फ्रिजची दुरुस्तीही केली नाही.दरम्यान, दुकान मालक गणेश जगताप याने फिर्यादी प्रेमकुमार यांच्या १७ वर्षीय मुलाला फ्रिजवर चढून चहाचे कप काढण्यास सांगितले. यामुळे मुलाला  विजेचा धक्का जोरदार बसला. त्यात मुलाचा मृत्यू झाला. 

अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर कामावर ठेवणे तसेच कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही म्हणून गणेश जगताप याच्यावर बालकामगार सुधारीत अधिनियम अतंर्गत गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक गणेश खारगे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेelectricityवीजDeathमृत्यूEmployeeकर्मचारीPoliceपोलिसtalawadeतळवडे