Pune Crime| ईमेल आयडी बदलून कंपनीला घातला एक कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 21:32 IST2022-07-06T21:25:14+5:302022-07-06T21:32:46+5:30
पिंपरी : कंपनीचा मेल आयडी आणि बॅंक खात्याचा तपशील बदलला असल्याचा ईमेल करून कंपनीची ९७ लाख १७ हजार २९४ ...

Pune Crime| ईमेल आयडी बदलून कंपनीला घातला एक कोटींचा गंडा
पिंपरी : कंपनीचा मेल आयडी आणि बॅंक खात्याचा तपशील बदलला असल्याचा ईमेल करून कंपनीची ९७ लाख १७ हजार २९४ रुपयांची फसवणूक केली. भोसरी येथील अँफेनॉल इंटरकनेक्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीत २४ ते २७ मे या कालावधीत ही घटना घडली.
कमलेश दत्तात्रय क्षिरसागर (वय ३३, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अँफेनॉल इंटरकनेक्ट इंडिया प्रा ली या कंपनीत अकाऊंट असोसिएट्स ऑफिसर पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालयाचा ईमेल आयडी आणि बॅंक खात्याचा तपशील बदलला असल्याचा ईमेल आरोपीने केला.
तसेच यापुढील आर्थिक व्यवहाराबाबत नवीन ईमेल आयडीचा वापर करावा, असे आरोपीने ईमेलमध्ये नमूद केले. फिर्यादीने कंपनीच्या कार्यालयाकडे देणे असलेले एकूण रक्कम ९७ लाख १७ हजार २९४ रुपये आरोपीने पुरवलेल्या बँक खात्यावर पाठवले. यात कंपनीची फसवणूक झाली, असे फिर्यादीत नमूद आहे.