मोशीतील उच्चभ्रू सोसायटीत कारची महिलेसह मुलाला धडक
By प्रकाश गायकर | Updated: January 22, 2025 19:26 IST2025-01-22T19:25:23+5:302025-01-22T19:26:27+5:30
या भीषण अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मोशीतील उच्चभ्रू सोसायटीत कारची महिलेसह मुलाला धडक
पिंपरी : एका भरधाव कारने मावशी आणि तिच्यासोबत असलेल्या बाळाला धडक दिली. ही घटना गुरूवारी (दि. १६) मोशी येथील प्रिस्टीन ग्रीन सोसायटीत घडली. या भीषण अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या अपघातात लहान मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर मावशीलाही मार लागला आहे.
१६ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, जखमी मुलाच्या वडिलांनी “माझ्याच मुलाची चूक होती, तोच गाडीसमोर धावत आला” असा जबाब पोलिसांना लिहून दिल्याने वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दरम्यान, अशा प्रकारे निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.